गुरुवारी रात्री रशियाच्या (Russia) संभाव्य आक्रमणाविरुद्ध स्वतंत्र (Independent) आणि लोकशाहीवादी (Democratic) युक्रेनच्या (Ukraine) समर्थनासाठी अमेरिकेच्या सिनेटने एक ठराव मंजूर केलाय. युक्रेनचे संरक्षण बळकट करण्यासाठी आणि सुरक्षा मदत देण्यासाठी राजकीय आणि लष्करी सहाय्य देऊन युक्रेनला पाठिंबा देण्याचे या ठरावात म्हटले आहे
युक्रेनवर आक्रमण झाल्यास युरोपमधील शांतता प्रस्थापीत करण्यासाठी रशियाला महत्त्वपूर्ण किंमत मोजावी लागेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या ठरावात म्हटले आहे. ब्रिटन आणि अमेरिकेनं रशियाकडे त्यांनी सैन्य मागे घेतल्याचे पुरावे देण्यास सांगितलं आहे. तर एका बाजुला रशियाने पूल उभारल्याचे फोटोही समोर आले आहेत.